भगवान बुध्दांचा अस्थी कलश सन्मानपूर्वक प्रतिष्ठापित करण्यासाठी व्दितीय बुद्धशासनाचे जागतिक अभियान


सब्बे बुद्धास बिंबे सकळ दसदिसे केस लोम दि धातू वन्दे, सब्बे पी बुधन्ग दसबल तनुंज ,बोधी चेतीय नमामि,वन्दामी चेतीय सब्ब सब्ब धनेसु पदेठीत ,सारिरीक धातू महाबोधी बुद्ध रूप सकल सदा.

 सर्व धर्म बांधवानो,आपण सर्व विपश्यना साधक आहात,या विपश्यना साधनेतूनच आपण निर्वाण प्राप्ती करू शकतो, केवळ पुस्तकी ज्ञानाने नाही ,तरी ध्यान साधना पुष्ट होण्यासाठी आणि भगवान बुद्धांच्या प्रति अपार श्रद्धा दाखवण्याची संधी आपल्याला विपश्यना सेवक संघातून मिळणार आहे ,बुद्धांच्या अस्ति धातु हे दिल्लीत संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत तरी ते आपल्याला मिळवून त्याना सर्वोच्च स्थानी ठेवून सर्व मानवाला त्याचा लाभ व्हावा या करिता आपल्या सर्वांनी एकत्र येण्यासाठी आणि धातूंची मागणी करण्यासाठी विपश्यना सेवक संघाचे सभासद व्हा. 

सतत ७ वर्ष गोयंका गुरुजी त्यानंतर आता विपश्यना सेवक संघ अथक प्रयत्न करीत आहे आणि ही जबाबदारी फक्त आमच्या एकट्याची नसून ज्या कोणाला बुद्धावर अपार श्रध्दा आहे आणि आपले पुण्यबळ वाढवायचे असेल अश्या सर्वांनी मनापासून प्रयत्न करून आपली मागणी मान्य करायला लावूया,एकट्याने हे होणार नाही सर्वांनी सहकार्य करावे, विपश्यना सेवक संघ च्या मार्फत हे करू,आणि हि बाब प्रत्येकाला सांगू,जेणेकरून सरकार जागे होईल,शेवटी ते पण माणसंच आहेत त्यांना जाणीव करून देने आपले काम आहे,ज्यांना काही सुचवायचे असेल तरी कळवा,कारण उद्देश नेक आहे एका पायांनी चालण्यापेक्षा कोटी पावलांनी लवकर पोहचू,















शैलेंद्र तांबे,8097736611
सूचना :- सामूहिक ध्यानसाधना विपश्यना सेवक संघाच्या कार्यलयात चालू करण्यात आली आहे ज्यांना कोणाला साधनेत सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा.

संपर्क- 
आयु. गौतम गायकवाड- संस्थापक अध्यक्ष

आयु. गौतम साळवी

प्रेमसागर गवळी 
मो. 9923060664

*विपश्यना सेवक संघ ऑफिस*
स्थळ:- *इ/३ मुलुंड सहकार विश्व को. ऑप. हौ. सोसायटी नाहूर रोड, जैन मंदिराच्या बाजूला, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०*
ई-मेल - vssigp@gmail.com
💐