विपश्यना : एक अनुभव

Social media च्या सततच्या वापरामुळे आपल्याला सगळ्यावर react व्हायची जणू खोडच जडली आहे. त्यामुळे कदाचित आपल जग विस्तारल असेलही पण स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद खुंटत चालला आहे. आजूबाजूच जग इतक भयंकर वेगात बदलत चालल आहे की टिकून राहण्याच्या धडपडीत कोणालाच कोणासाठी फारसा वेळ उरलेला नाहीये. स्वतःसाठी वेळ काढावा म्हटल तरी 'बापरे!एवढे दिवस कठीणच वाटतय, बघू जमल तर नाहीतर पुढच्या वेळेस नक्की'. अस सर्व असताना काहीह कचरतच विपश्यनासाठी online registration करुन ठेवल. जाण्याआधी कटाक्षाने त्यावर काही research टाळला, म्हटल बघू स्वतःलाच surprise करून, बाकी काय झेपेल तेवढ निभवायच.

तिथे पोहोचल्यावर phone आणि पैसे deposit करताना जीवाची चांगलीच घालमेल झाली पण comfort zone च्या पलीकडील या जगाबद्दल कमालीच औत्सुक्य होत. आजूबाजूला एवढी सारी माणस असताना, ती ही वेगवेगळ्या वयोगटातील म्हणजे अगदीच वयवर्ष १९ ते ८० अशा range मधली, वेगवेगवेगळ्या प्रदेशातील आणि बक्कळ अनुभव असलेली, अशा परिस्थितीत १० दिवस न बोलत राहण म्हणजे खरी सत्वपरीक्षा. बरं वाचन-लिखाणही पूर्णपणे बंद आणि खाण्यावरही निर्बंध, थोडक्यात आपला गुंता आपला आपणच सोडवायचा. आणि हे थोडथोडके नव्हे तर १० दिवसांचे व्रत.


पण ह्या सगळ्यात मला भावलेली गोष्ट म्हणजे मोबाईल, पैश्यांसोबतच गंडे, तावीज़, दोरे, लॉकेट, विभूती, तस्वीर इत्यादी इत्यादी, मग ते कोणत्याही धर्माचे असल्यास तेही deposit करायच. बाहेर पडताना कदाचित तुम्हाला यातील कशाचीच गरज भासणार नाही किंवा कोणत्याही नवा बाबा-बुवा/धर्म शिबिरातून तुमच्यासोबत घरी येणार नाहीत यांची शाश्वती बाळगावी. 
सतत काहीतरी पाहण्याची, वाचण्याची, बोलण्याची, बर्यापैकी खिदळण्याची सवय असलेल्या मला सुरुवातीला कठीण गेल पण कशाचही ओझ वाटल नाही आणि १० व्या दिवशी जेव्हा शिबीर संपल तेव्हा निरभ्र आभाळासारख स्वच्छ आणि खर्या अर्थाने soul cleansing झाल्याचा हलकेपणा तसच अशक्य वाटलेल निभावल्याचा आनंद वेगळाच होता. शेवटच्या दिवशी मौन संपल्यावर सर्वांशी ज्या गप्पा झाल्या त्यावर पुन्हा कधीतरी लिहिन. पण धर्म-जात, बुवाबाजी पलीकडल हे तत्त्वचिंतन आणि ध्यान आपल्याला आत्ममग्नतेतून आत्मचिंतनाकडे आपल्याही नकळत घेऊन जाते.

ता.क. - विपश्यनेच्या technique बद्दल किंवा तत्त्वज्ञानाबद्ल मुद्दामहून तपशील दिले नाहीत. आपला स्वतःच असा अनुभव असल्याने प्रत्येकाला प्रत्येकवेळी नवे काहितरी गवसेल एवढे मात्र नक्की. शक्यतो एकटच जाव, शिकण्यासारख आणि करण्यासारखे खूप काही असल्याने एकट वाटणार नाही एवढ नक्की.
Neha Rane

Premsagar Gavali

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

और नया पुराने