'हॅप्पी व्हिलेज प्रोजेक्ट'


'हॅप्पी व्हिलेज प्रोजेक्ट' मध्ये सेवेची संधी आम्हांला मिळत आहे, मुळात हिच आनंदाची बाब आम्हां सर्वांची आहे. 'हॅप्पी व्हिलेज' काय आहे? विपश्यना संशोधन केंद्र मुंबई, व महाराष्ट्र शासनाचा हा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमात आनापान व विपश्यना ध्यानातून गाव आनंदी बनवले जात आहे. प्रत्येक गावात समस्या तर आहेत, परंतु ह्या समस्या सोडवण्यासाठी आनापान व विपश्यना ध्यानाचा वापर होतोय. सकारात्मक दृष्टिकोणातून ह्या समस्या कडे ग्रामस्थ पाहत आहेत. नकारात्मकता भावना नष्ट होत आहे.

ग्रामस्थ वेसनाधीनतेतून बाहेर येत आहेत.कार्यक्षमतेत वाढ, सुखी आनंदी जीवन जगण्यास साधनेची मदत होत आहे. या सारखे अनेक फायदे ग्रामस्थांना होत आहेत. अश्या बऱ्याच प्रतिक्रिया आम्हांला येथे काम करतांना मिळत आहेत. आम्हीं सर्व आनंदीगाव स्वयंसेवक या ठिकाणी स्वखर्चाने येऊन, सर्वांना आनापान देतोत. विपश्यना शिबिर करण्यास प्रोत्साहित करून त्यांचे फॉर्म भरून देतोत. प्रकल्पाच्या सुरवातीला सर्व ग्रामस्थां कडुन चाळीस प्रश्नांची वैयक्तिक सुखाची प्रश्नावली भरून घेतली. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रश्नावली होती. त्या नंतर 'घरोघरी आनापान' प्रकल्प राबविला.या कार्याने आम्हांला आत्मिक समाधान, आनंद मिळतो. मागील तीन महिन्यांत आम्ही जवळपास चार हजार लोकांना म्हणजे 90 टक्के ग्रामस्थांना आनापान देऊ शकलो आहोत. पन्नास ग्रामस्थांनी दहा दिवासाचे शिबीर पुर्ण केले आहे. रोज सकाळ संध्याकाळ ते ध्यान करतात. याचे चांगले उदाहरण येथील सरपंच बालाजी वाघमारे यांचे तंबाखू दारूचे पंचवीस वर्षा पासूनचे वेसणातून मुक्तता झाली आहे. अशी बरीचशी उदाहरणे या ठिकाणी मिळतील. पूर्णत्वास अजुन प्रकल्प आला नसला तरी सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
या सर्व कामाचे श्रेय विपश्यना विशोधन विण्यास मुंबईचे व महाराष्ट्र शासनाचे आहे. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ.निखिल मेहता हे आहेत. डॉ संग्राम जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे. खरच विपश्यनाचा डंका वाजला आहे. एका प्रवचनात पुज्य गुरुजी म्हणतात की, पूर्वी गावोगावी विपश्यनाची चर्चा व्हायची. नदीच्या काठी धुणे धुतांना, बायका साधनेची चर्चा करायचे तसेच काही या गावात आम्हांला पहायला मिळाले. कावलगाव हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात येते. या अवश्य भेट दयायला.














#Vipassana Research Institute.
- Article by Hatkar Prashant Dattatray

Premsagar Gavali

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

और नया पुराने